ऊन हाय का काय?; वाळूत अंडे उकडले, पापड भाजला, तर विदर्भात कोळशाचा ट्रकच पेटला
उन्हाडा तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही होत असून भरदुपारच्या प्रहरात वाहने जळत आहेत, अमरावतीत आज कोळशाने भरलेला ट्रक पेटल्याचं दिसून आलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरात उष्णतेची मोठी लाट आली असून तापमान तब्बल 50 अंश सेल्सियपर्यंत पोहोचले आहे. राजस्थानमध्ये तब्बल 50 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.
राजस्थानच्या वाळवंटातील एका जवानचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये, तेथील उन्हाची तीव्रता दर्शवताना ह्या जवानाने चक्क रेतीमध्ये पापड भाजल्याचे पाहायला मिळत आहे.
तर, याच जवानाने दुसऱ्यादिवशी चक्क अंडे वाळवंटातील रेतीत उकडल्याचं दिसून येते. विशेष म्हणजे रेतीतील उष्णतेमुळे काही वेळातच हे अंडे उकडल्यानंतर ते जवानाकडून खायले जात आहे.
राजस्थानच्या बिकानेरमध्ये बीएसएफ जवानाने तेथील तापमानाची तीव्रता दर्शवणारा हा व्हिडिओ बनवला आहे.
महाराष्ट्रातही उष्णतेची भयानक लाट जाणवत असून विदर्भ, खान्देशात पार 45 अंश सेल्सियसच्या पुढे गेला आहे.
अकोला जिल्ह्यात तापमान तब्बल 45.8 अंश सेल्सियपर्यंत पोहोचलं असून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधक उपाय म्हणून कलम 144 लागू केले आहे.