31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार तर महाराष्ट्रात...
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे. तर कुठं अवकाळी पाऊस (Rain) कोसळत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App31 मे रोजी केरळमध्ये (Keral) मान्सून (Monsoon) दाखल होणार आहे, तर 10 जून दरम्यान मुंबईसह (Mumbai) कोकणात मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
15 जून दरम्यान कोकणातून सह्याद्रीचा घाटमाथा ओलांडून खान्देश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात तसेच मराठवाडा विदर्भात मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले.
सध्या मान्सून प्रगतीपथावर आहे. आज निम्मा बंगालचा उपसागर क्षेत्र तसेच श्रीलंकेचा भुभागही दोन हिस्याने काबीज केला असल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
10 जून दरम्यान महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे.
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate change) होत आहे. कुठं उन्हाचा चटका जाणवत आहे.
सध्या राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे.