Rahul Gandhi: चप्पल पुसली ते भांडी धुतली, सुवर्ण मंदिरात राहुल गांधींकडून सेवा; 10 फोटोंना हजारो लाईक्स
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे दोन दिवस राजकारणापासून दूर राहून अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सेवा करण्यासाठी पोहोचले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधींनी दोन दिवस सर्वसामान्य भक्ताप्रमाणे कार सेवा केली. भक्तांची पादत्राणे पुसण्यापासून ते त्यांची भांडी घासण्यापर्यंतची कामं राहुल गांधींनी केली.
विमानतळावर किंवा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात काँग्रेसचं कोणीही भेटायला येणार नाही, असं राहुल गांधींनी आधीच ठणकावून सांगितलं.
शीख परंपरेनुसार, कार सेवा म्हणजे स्वैच्छिक श्रम किंवा सेवेतून भक्ती दर्शवण्याचा मार्ग. त्याप्रमाणे खासदार राहुल गांधी भांडी धुताना देखील दिसले.
लंगरमध्ये राहुल गांधींनी सुवर्ण मंदिरातील लोकांना जेवण देखील वाढलं.
दुसऱ्या दिवशी राहुल गांधींनी पादत्राणे सेवा केली.
सुवर्ण मंदिरात त्यांनी शू काउंटरवर उभे राहून मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या चपला ठेवायचं काम केलं.
विमानतळावर कोणीही त्यांना घ्यायला किंवा सोडायला येणार नाही, असं त्यांनी सर्व नेत्यांना सांगितलं होतं.
त्यामुळे राहुल गांधी मंदिरात केवळ वैयक्तिक सहकारी, गुरुद्वाराचे कर्मचारी आणि सेवादारांसोबतच दिसत होते.
राहुल गांधींनी मंदिराच्या स्वयंपाकघरात भाजी कापून सेवा केली.
दोन दिवस सुवर्ण मंदिरात राहुल गांधींनी सर्व भक्तांसोबत सामान्यपणे जीवन जगून सेवा केली.