Ravichandran Ashwin : रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गाबा मैदानावर खेळण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतिसऱ्या कसोटी सामन्यात भारतापुढे विजयासाठी 275 धावांचे लक्ष्य होते.
दुसऱ्या डावात भारताने कोणतेही विकेट न गमावता 8 धावा केल्या, त्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला आणि अखेर सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. या सामन्यानंतर अश्विनने निवृत्तीची घोषणा केली आहे.
38 वर्षीय रविचंद्रन अश्विन हा भारताकडून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांपैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे.
अश्विनच्या नावावर 537 कसोटी विकेट्सची नोंद असून, त्याने 37 वेळा एका डावात पाच बळी घेतल्याचा विक्रम केला आहे.
तसेच, कसोटी क्रिकेटमध्ये 11 वेळा प्लेयर ऑफ द सीरीजचा मान मिळवून त्याने श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
फिरकीपटू म्हणून अश्विनचा 50.7 चा स्ट्राईक रेट (200+ विकेट्ससाठी) हा आतापर्यंतचा सर्वोत्तम स्ट्राईक रेट मानला जातो.
भारतीय संघातील त्याच्या कामगिरीने क्रिकेटप्रेमींच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले आहे.
अश्विनच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असून, चाहत्यांसाठी ही एक धक्कादायक बातमी आहे.
गाबा कसोटीदरम्यान अश्विन टीम इंडियाच्या खेळाडूंना कडकडून मिठी मारली.
निवृत्तीची घोषणा करण्याआधी आर अश्विन कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला मिठी मारताना दिसला.