PM मोदींना अरबी भाषेतील रामायण अन् महाभारत गिफ्ट; कुवैतमध्ये खास व्यक्तीची भेट
कुवैतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबर अल-सबाह यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय कुवैत दौऱ्यावर पोहोचले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App43 वर्षांमध्ये कुवैतची यात्रा करणारे नरेंद्र मोदी हे पहले भारतीय पंतप्रधान आहेत, ज्यांचे खाड़ी देशातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. भारत आणि कुवैत हे पश्चिम आशियात शांति, सुरक्षा आणि स्थैर्य हिताला प्राधान्य देत असल्याचे मोदींनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कुवैत दौऱ्यावर असून तेथील भारतीयांच्या गाठीभेटी घेत देशवासीयांशी संवाद साधला. आज कुवैतमध्ये मिनी हिंदुस्थान पाहायला मिळतोय, असेही मोदींनी म्हटले.
भारताला जेव्हा सर्वाधिक गरज होती, तेव्हा भारताला लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा कुवैतनेच केला. तर, भारतानेही ऑक्सिजन व वैद्यकीय पथके रवाना करत कुवैतला मदत केल्याची आठवण मोदींनी सांगितली.
मोदींना या दौऱ्यात अरबी भाषेतील रामायण व महाभारत या ग्रंथांची प्रत भेट देण्यात आली. अब्दुल्ला अल बरुन व अब्दुल्ल लतिफ अल नसिफ यांनी हे भाषांतर केल्याचं मोदींनी ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं.
भारतीय संस्कृती आणि ग्रंथांना जागितक ओळख देण्याचं काम त्यांनी या भाषांतराच्या प्रयत्नातून केल्याचंही मोदींनी म्हटलं आहे.
नरेंद्र मोदींनी कुवैतमध्ये माजी भारतीय परराष्ट्र अधिकारी मंगलसेन हंडा याचीही भेट घेतली. हंडा यांनी व्हिल चेअरवर येऊन मोदींना हस्तांदोलन देत संवाद साधला.
नरेंद्र मोदींनी कुवैत दौऱ्यात भारतीय नागरिकांना नमस्कार करत तिरंगाही फडकवला. त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ते फोटोही शेअर करण्यात आले आहेत