Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुखांच्या हत्येनं मस्साजोग हादरला; फडणवीसांची घोषणा अन् बीडमध्ये नवीन SP, कोण आहेत नवनीत कावंत?
बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचा निर्घूनपणे खून करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंतोष देशमुख यांच्या हत्येवरुन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूण घटनाक्रम आणि चौकशीची माहिती दिली. तसेच काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात बीडच्या पोलीस अधिक्षकांच्या बदलीची घोषणा केली होती. त्यानंतर आज नवनीत कांवत यांची बीडच्या नवे पोलीस अधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जिल्हा पोलीस प्रमुख अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली होती. आता अविनाश बारगळ यांच्या जागी नवनीत कांवत बीडचे नवीन पोलीस अधिक्षक असणार आहेत. (photo credit- Navneet Kanwat)
कोण आहेत नवनीत कावंत?- नवनीत 2017 बॅचचे IPS आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरात उपायुक्त असलेले नवनीत कांवत बीडचे नवे एसपी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. नवनीत कांवत हे मूळचे राजस्थानचे आहेत. त्यांनी IIT रुरकीमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं आहे. नवनीत कांवत यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत.(photo credit- Navneet Kanwat)
नवनीत कांवत यांचं सहावीपर्यंतचं शिक्षण मुरादाबादमध्ये झालं. सहावी ते 12 वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगढ इथे झालं. नवनीत कांवत हे शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते. वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी दहावी, 11 वी आणि 12 वी या तीन वर्षात सैनिक स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकावला.(photo credit- Navneet Kanwat)
स्वत:वर विश्वास ठेवून दहावीत टॉप केलं. 12 वीनंतर नवनीत यांनी आयआयटीमध्ये प्रवेश केला, तिथे नवनीत कांवत यांनी बी.टेक केलं. (photo credit- Navneet Kanwat)
आई शिक्षिका, वडील रेल्वेत होते, नवनीत कांवत लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले, पण नवनीत कांवत यांचा ओढा खासगी क्षेत्रात होता.(photo credit- Navneet Kanwat)
नवनीत यांनी IIT मधून पदवी मिळवल्यानंतर, त्यांनी सॉफ्टवेअर डिजाईन इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत नोकरी केली. (photo credit- Navneet Kanwat)
नवनीत कांवत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले. तिथे नवनीत कांवत अभ्यास करुन ते 2017 मध्ये IPS बनले.(photo credit- Navneet Kanwat)