Titanic : ...तर टायटॅनिक जहाज दुर्घटना टाळता आली असती? 'कधीही न बुडणार जहाज' नेमकं बुडालं कसं? वाचा सविस्तर
टायटॅनिक जहाज दुर्घटना 1912 मध्ये घडली. 10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज त्याच्या पहिल्या आणि शेवटच्या प्रवासासाठी निघालं होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appटायटॅनिक जहाज इंग्लंडमधील साउथॅम्प्टन येथून निघालेल्या न्यूयॉर्कपर्यंतच्या पहिल्या प्रवासासाठी निघालं होतं. 4 दिवसांच्या प्रवासानंतर, 15 एप्रिल रोजी मध्यरात्री ते एका हिमनगाला धडकले आणि त्याचे दोन तुकडे झाले. यामुळे टायटॅनिक जहाज अटलांटिक महासागरात बुडालं. अशा प्रकारे टायटॅनिक जहाजाचा पहिला प्रवासच त्याचा अखेरचा प्रवास ठरला.
टायटॅनिक हे त्या काळातील सर्वात मोठे जहाज होतं. याला तरंगतं शहर असंही म्हटलं जात असे. टायटॅनिक जहात 882 फूट लांब आणि 46,000 टन वजनाचे होते. हे जहाज आधुनिक तंत्रज्ञानाचा एक अनोखा नमुना होता.
टायटॅनिक जहाजाला हिमनगाबाबतची चेतावणी पाणवण्यात आली होती. पण दुर्दैवाने कर्मचाऱ्यांनी या धोक्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. टायटॅनिकचा रेडिओ ऑपरेटर निष्काळजीपणे झोपी गेला होता.
त्यामुळेच अपघात झाला तेव्हा तो प्रतिसाद देण्यासाठी वेळेवर उपलब्ध नव्हता. या अपघातात 1500 लोकांचा मृत्यू झाला होता. यामध्ये 832 प्रवासी आणि 685 कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
टायटॅनिक जहाज पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेलं होतं. कधीही न बुडणारं जहाज असंही याला म्हटलं जात असे. पण, या कधीही न बुडणाऱ्या जहाजाला जलसमाधी मिळाली.
टायटॅनिक जहाज दुर्घटना 1912 साली घडली. पहिल्या प्रवासावर निघालेल्या टायटॅनिक जहाजाला अटलांटिक महासागरात जलसमाधी मिळाली.
यानंतर तब्बल 73 वर्षांना या जहाजाचे अवशेष सापडले. टायटॅनिक जहाजाचे अवशेष 1985 मध्ये सापडले होते. हे समुद्र तळाशी 15 स्क्वेअर मैल परिसरात पसरलेले आहेत. 1985 साली रॉब बॅलाड आणि त्यांच्या टीमने पहिल्यांदा समुद्राच्या तळाशी टायटॅनिक जहाजाचे अवशेष शोधले.