9 महिन्यांची गर्भधारणा नाही, तर 36 महिन्यांनंतर देते मुलाला जन्म
सर्व प्राणी त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रजनन करतात. मानवी मूल नऊ महिने गर्भाशयात वाढतं. पण काही प्राण्यांची मुले वर्षानुवर्षे गर्भाशयात वाढतात. यादीत त्यांची नावे पहा...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमादी गाढवीचा गर्भधारणा कालावधी 12 महिन्यांचा असतो. त्यामुळे गाढवाचं पिल्लू एक वर्ष गर्भाशयात वाढतं.
उंट 13 ते 15 महिने गर्भाशयात राहतात. उंटीण सुमारे 410 दिवस बाळाला गर्भाशयात ठेवल्यानंतर त्याला जन्म देतो.
जिराफचं पिल्लू पोटात म्हणजेच गर्भाशयात 13 ते 16 महिने वाढतं. जिराफाप्रमाणे त्याचं पिल्लूही खूप उंच असतं.
पांढरी मादी गेंडे वगळता इतर सर्व मादी गेंडे 15 ते 16 महिन्यांच्या गरोदर असतात. तर पांढर्या मादीच्या गर्भधारणा कालावधी 16 ते 18 महिन्यांचा असतो.
मादी हत्तीचा गर्भधारणा कालावधी सर्वाधिक असतो. हत्तीण 680 दिवस बाळाला गर्भात ठेवते. म्हणजे हत्तीणीच्या गर्भधारणेचा कालावधी सुमारे दोन वर्ष आहे.
हत्तीच्या गर्भधारणचा कालावधीपेक्षा ही एका प्राण्याचा कालावधी आहे. या मादी सुमारे तीन वर्षानंतर बाळाला जन्म देते.
काळ्या रंगाची पाल ज्याला ब्लॅक सॅलॅमंडर असं म्हणताता त्याच्या गर्भधारणेचा कालावधी आणखी लांब असतो. ब्लॅक सॅलॅमंडरच्या गर्भधारणेचा कालावधी 24 ते 36 महिने आहे. म्हणजे सुमारे दोन ते तीन वर्ष बाळ गर्भात ठेवल्यानंतर मादी पिल्लाला जन्म देते.