Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Indian Rupee : जगातीला काही निवडक देशांमध्ये आपण फिरायला गेलो तर आपल्याला फिरण्याचा मनसोक्त आनंद घेता येऊ शकतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकारण जगातील असे अनेक देश आहेत, ज्यांचे चलन भारतीय चलनापेक्षा दुबळं आहे. म्हणजेच त्यांच्या तुलनेत भारताच्या एक रुपयाची किंमत जास्त आहे.
भारताच्या रुपया त्यांच्या चलनावर भारी पडत असल्याने अशा देशात देशात आपल्याला फिरणे फायदाचे ठरु शकते.
जगातील कोणत्या देशांमध्ये भारताचा रुपया 300 पट होतो, हे जाणून घेऊयात...
व्हिएतनाम असा देश आहे, जेथे भारतीय रुपयाची किंमत 353.80 व्हियतनामी डोंग होते.
व्हिएतनाममध्ये फिरायला जाणाऱ्या भारतीयांची संख्याही मोठी आहे.
सध्याच्या घडीला आणि नव्या ट्रेंडनुसार, भारतीय लोक तिथे आनंदाने राहू शकतात.
व्हिएतनाममध्ये 1 रुपयाच्या बदल्यात 353.80 डोंग मिळतात, त्यामुळे आपल्याला स्वस्तात फिरता येऊ शकते.
व्हिएतनामशिवाय इंडोनेशियामध्ये देखील भारताच्या रुपयाची किंमत वाढते. इंडोनेशियामध्ये भारताच्या एका रुपयाची किंमत 207.74 रुपये होऊ शकते.
कंबोडिया, मंगोलिया आणि हंगेरीमध्ये देखील भारताच्या रुपयाची किंमत तुलनेने जास्त होते.