Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी कुटुंबाच्या श्रीमंतीची नेहमी चर्चा केली जाते, मात्र अंबानी कुटुंब फक्त पैशांच्या बाबतीतच नाही, तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंबानी कुटुंबात अनेकांनी प्रेम विवाह केला आहे. धीरुभाई अंबानी यांच्या काळातच अंबानी कुटुंबात प्रेम विवाह करण्यास सुरुवात झाली होती.
धीरुभाई अंबानी यांनी आपल्या दोन्ही मुलांच्या प्रेम विवाहाला परवानगी दिली होती. त्यांनी दोघांचे लग्नही लावले होते.
मुकेश अंबानी आणि त्यांचे बंधू अनिल अंबानी या दोघांनीही प्रेम विवाह केला होता.
मुकेश अंबानी यांचे वडिल धीरुभाई अंबानी यांनी 1984 मध्ये नीता आणि मुकेश यांच्या विवाहाला संमती दिली होती.
मुकेश आणि नीता अंबानींचा विवाह 1985 मध्ये पार पडला होता, हे त्यांचे लव्ह मॅरेज होते.
धीरुभाई अंबानी यांनी छोटा मुलगा अनिल अंबानी आणि अभिनेत्री टीना मुनीम यांचा विवाह 1991 मध्ये लावला होता.
आकाश आणि अनंत अंबानीचा प्रेम विवाह श्लोका मेहता आणि राधिका मर्चंटसोबत पार पडला आहे.
मुलगी ईशा अंबानी हिचा विवाह कोट्याधीश आनंद पिरामिल यांच्यासोबत झाला आहे.
मुकेश अंबानी यांची बहीण दिप्ती साळगावकर यांचाही प्रेम विवाह झाला आहे.