Pune Metro line inauguration: पंतप्रधान नरेंद्र मोदीकडून मेट्रोचं उद्घाटन करण्याआधी 'मविआ'चा राडा, घोषणाबाजी अन्..
मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यानंतर विरोधकांनी दौरा रद्द झाला म्हणून सत्ताधारी नेत्यावर हल्लाबोल केला, त्याचबरोबर मेट्रोचे काम होऊन अनेक दिवस झाले मात्र, लोकार्पणसाठी ती सामान्यांसाठी खुली केली नसल्याचा आरोप केला, त्यानंतर आता या लोकार्पण सोहळ्याची नवी तारीख समोर आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरविवारी २९ तारखेला लोकार्पण होणार आहे, मात्र याविरोधात मविआचे नेते संतप्त झाले आहेत, त्यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे, तर लाल फित कापत त्यांनी लोकार्पण केलं असून आजच आम्ही मेट्रोने प्रवास करणार म्हणत आक्रमक झाले आहेत. यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ( ठाकरे गट ) शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाबाहेर भर पावसात आंदोलन केलं आहे.
'मेट्रो स्थानकाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त कशाला? 'आताच मेट्रो स्थानक सुरू करा,' 'मेट्रो आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,' असं म्हणत महाविकास आघाडीच्या आंदोलकांनी स्थानकात शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्थानकाबाहेर रोखून धरलं आहे. .
पंतप्रधान मोदींनी गुरूवारी ऑनलाईन उद्घाटन का केलं नाही. 29 तारखेला कोणता मुहूर्त आहे? पुणेकरांनी केंद्रीय मंत्री दिला आहे, त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं असतं, तर काय झालं असता का? मोदींच्या हाताला असं काय लागलं आहे? अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांनी दिली.
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा केविलवाणा प्रयत्न आहे. पंतप्रधानसारख्या उंचीच्या व्यक्तीनं कुठली उद्घाटन करावी, याची आचारसंहिता करावी लागणार आहे. नाहीतर चौक आणि रस्त्याच्या उद्घाटनासाठीही पंतप्रधान मोदी येतील, असा रोष व्यक्त केला.