Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्कॉर्पिओला टक्कर, हुंडईची अल्काझार SUV लाँच; 9 रंगात, शानदार रुबाबात
हुंडई कंपनीची नवी एसयुव्ही कार बाजारात लाँच करण्यात आली असून चारचाकी खरेदी करणाऱ्यांना बेस्ट ऑप्शन मिळाला आहे. महिंद्राच्या स्कॉर्पिओ अन् टाटा सफारीला ही कार टक्कर ठरू शकते
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनमध्ये ही कार उपलब्ध आहे. 1.5 मीटर टर्बो जीडीआय पेट्रोल इंजिनची शक्ती असलेल्या कारची किंमत 14 लाख 99 हजार तर 1.5 लीटर यू2 सीआरडीआय डिझेल इंजिनच्या कारची किंमत 15 लाख 99 हजरा रुपये आहे.
आकर्षक एक्स्टीरिअर डिझाईनलाइन आणि लक्षवेधक आसन व्यवस्था पाहून ग्राहकांनाही ही कार मनात भावते. तर, इंटीरिअर्स केबिनमध्ये रिलॅक्स, हाय-टेक व आरामदायी प्रवासाचा अनुभव देते.
आरामदायी वैशिष्टये - दुसऱ्या रांगेमध्ये बाय कुशन एक्सटेंशनसह, दुसऱ्या रांगेत व्हेण्टिलेटेड सीट्स, सीट्समध्ये सुधारित कुशनिंग व बॉल्स्टरिंग, विंग टाइप हेडरेस्ट बाणि इतर अनेक फिचर्स आहेत
आकर्षक नवीन ह्युंदाई अल्काझार एनएफसी तंत्रज्ञान असलेला डिजिटल कीसह येते. हुंडई स्मार्टसेन्स लेव्हल 2 एडीएएससह 19 वैशिष्टये ट्रायटिंग सुरक्षितता, सोयीसुविधा आणि पार्किंग सुरक्षिततेची खात्रीसह कार उपलब्ध आहे.
9 आकर्षक रंग पर्यायांसह नवीन रॉबस्ट एमरॉल्ड मॅट, 4 विशिष्ट व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध एक्झिक्युटिव्ह, प्रेस्टिज, प्लॅटिनम बाणि सिग्नेचर