Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Selfie: सेल्फी जीवावर बेतली,जगभरात किती जणांनी जीव गमावला? भारताचा कितवा नंबर?
सेल्फी काढण्याची जगभरात क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. मित्रांसह सेल्फी काढणं ही काही चुकीची गोष्ट नाही. मात्र, सेल्फी कोणत्या ठिकाणी काढायची याचं भान न राहिल्यानं अनेकांचा मृत्यू झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरवर्षी सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात अनेकांनी जीव गमावला आहे. कधी रेल्वेच्या समोर तर कधी टेकडीवर उभं राहून सेल्फी काढणं अनेकांच्या जीवावर बेतलं आहे.
जर्नल ऑफ ट्रॅवल मेडिसिनमध्ये 2022 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात गेल्या 13 ववर्षात सेल्फी काढताना 379 जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख आहे.
यातील 140 पर्यटक असे होते ज्यांनी सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना जीव गमावला आहे. सेल्फी काढण्याचा प्रयत्न करताना सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत. वर्ल्ड ऑफ स्टेस्टिक्स 2024 च्या रिपोर्टनुसार भारतात 190 लोकांनी सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात जीव गमावला आहे. तर, 55 लोक एक सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात जखमी झालेत.
सेल्फी काढण्याच्या प्रयत्नात पाण्यात बुडणे, टेकडी किंवा डोंगरावरुन दरीत पडणे, रेल्वे समोर येणे, बंदुकीचा वापर करुन सेल्फी काढणे यात अनेकांचा मृत्यू झाला आहे.