Vastu Tips : जेवताना 'या' दिशेला तोंड करुन जेवल्यास दूर होते गरीबी, धन-संपत्तीत येते बरकत; आरोग्यही राहतं उत्तम
असं म्हणतात की, आपण जे अन्न खातो आपलं मनदेखील त्यासारखंच असतं. यासाठीच अन्न बनविण्याच्या आणि खाण्याच्या काही नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. जेणेकरुन, तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी टिकून राहील. तसेच, तुमचं आरोग्य निरोगी राहील.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवास्तू शास्त्रानुसार, कोणत्या दिशेला तोंड करुन जेवावं हे जाणून घेऊयात.
जेवताना आपण नेहमीच वास्तू शास्त्रात सांगितलेल्या दिशेनुसार जेवण करावे. अन्यथा, चुकीच्या दिशेला तोंड करुन जेवल्यास त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात.
वास्तू शास्त्रानुसार, पूर्व किंवा उत्तर-पूर्व दिशेला तोंड करुन भोजन करणं फार शुभ मानलं जातं. या दिशेला तोंड करुन जेवल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच, घरात धन-धान्याची बरकत होते.
जेवण जेवण्यासाठी पश्चिम दिशासुद्धा अशुभ मानण्यात आली आहे. या दिशेला तोंड करुन जेवल्याने कर्ज वाढ होते.
ज्या ठिकाणी तुम्ही जेवण बनवता ते किचन तुम्ही कधीही अस्वच्छ ठेवू नका. तसेच, खरकटी भांडी ठेवू नका.
दक्षिण दिशेला तोंड करुन जेवणं सर्वात जास्त नुकसानकारक आहे. भोजन करण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात अशुभ मानण्यात आली आहे. यामुळे घरात रोगराई पसरते. आयुष्यात नकारात्मकता येते.
वास्तू शास्त्रानुसार, कधीही बिछान्यावर बसून भोजन करु नये. असं केल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. तसेच, कर्जवाढ होते.
नेहमी, तुम्हाला हवं तितकंच अन्न शिजवा तसेच, अन्न ताटात घ्या. अन्नाचं नुकसान करु नका. तसेच, अन्न फेकूनही देऊ नका. अन्न फेकल्याने देवी अन्नपूर्णा आणि देवी लक्ष्मी नाराज होते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)