Pet Dogs : पाळीव कुत्र्यांना किस करणं किती सुरक्षित? संशोधनात 'ही' माहिती उघड
प्राण्यांना जवळ घेणं किंवा किस करणे ही प्रेम व्यक्त करण्याची पद्धत मानली जाते. ज्या लोकांना पाळीव प्राण्यांच्या किंवा कुत्रे-मांजर यांची आवड आहे, त्यांच्यासाठी हे सामान्य आहे. (PC:unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअनेक लोकांना असे वाटते की पाळीव प्राण्यांना किस केल्याने आपल्याला अनेक प्रकारचे संक्रमण पसरण्याचा धोका असतो. पण आता याबाबतीतील नवीन संशोधन समोर आलं आहे. (PC:unsplash)
हार्वर्ड विद्यापीठाकडून यासंदर्भात एक नवीन संशोधन करण्यात आले आहे. (PC:unsplash)
या संशोधनामध्ये आढळून आलं आहे की, कुत्र्यांच्या तोंडात सुमारे 600 वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. तसेच, मानवाच्या तोंडात सुमारे 615 वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात.(PC:unsplash)
मानव आणि कुत्र्यांच्या तोंडातील जीवाणूंचे प्रमाण सारखेच आहे. संशोधनानुसार, माणसाच्या तोंडात आढळणारे बॅक्टेरिया आणि कुत्र्याच्या तोंडात आढळणारे बॅक्टेरिया जवळजवळ सारखेच असतात. (PC:unsplash)
यामुळे असे मानले जाते की जेव्हा तुम्ही कुत्र्याला किस करता तेव्हा मानवासाठी हानिकारक नसते. (PC:unsplash)
किस केल्याने कुत्र्यांच्या तोंडातील बॅक्टेरिया तुमच्या शरीरात प्रवेश करत नाहीत आणि याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकत नाही. (PC:unsplash)
दरम्यान, हार्वड विद्यापीठाकडून हे संशोधन फक्त कुत्र्यांवरच करण्यात आले आहे. मांजर किंवा इतर प्राणी पाळतात त्यांनी जर प्राण्यांना किस केल्याने तुम्हाला काही प्रमाणात बॅक्टेरियामुळे संसर्ग होऊ शकतो. (PC:unsplash)
याशिवाय पाळीव प्राण्यांव्यतिरिक्त रस्त्यावरील कुत्र्यांकडूनही तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका असतो. (PC:unsplash)
भटके कुत्रे रस्त्यावरील किंवा घाणीतील अनेक गोष्टी खातात, ज्यामुळे त्यांच्या तोंडात अनेक गंभीर आजार पसरवणारे बॅक्टेरिया वाढू लागतात. म्हणूनच जर तुम्ही त्यांना किस केले तर तुम्ही संसर्ग होण्याची शक्यता असते. (PC:unsplash)
जर तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला कच्चे मांस खायला दिले तर चुकूनही त्याला किस करू नका. (PC:unsplash)
कच्चे मांस खाल्ल्याने कुत्र्यांच्या तोंडात साल्मोनेलासारखे आजार होण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत कच्चे मांस खाणाऱ्या कुत्र्याला किस तुम्हीलाही हा आजार होण्याचा धोका संभवतो. (PC:unsplash)