Nashik: मालेगाव शेतकऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन अखेर मागे
महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास वर्षावर आंदोलन करणार असल्याचे इशारा देण्यात आला आहे.
Nashik
1/7
अखेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेले बिऱ्हाड आंदोलन मागे घेण्यात आले.
2/7
पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी फोन वरून चर्चा केल्यानंतर सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे राजू शेट्टी यांनी केले जाहीर केले.
3/7
नाशिक जिल्हा बँकेच्या वसुलीविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले होते. गेल्या महिनापूर्वीच याबाबत आवाहन देण्यात आले होते. त्यानुसार आज जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र आज मालेगाव ईदगाह मैदानावर आंदोलन छेडण्यात आले होते.
4/7
दुपारनंतर पालकमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना फोन करत मागण्या मान्य करत असल्याचे आवाहन केले.यानंतर काही वेळात ठोस आश्वासन घेत राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली बिऱ्हाड आंदोलन मागे घेण्यात आले.
5/7
जर मागण्या मान्य करण्यास कुचराई केली तर 16 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्याच्या बंगल्यावर बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आली आहे.
6/7
दरम्यान आज आंदोलनापूर्वी दादा भुसे आणि राजू शेट्टी यांच्यात बैठक झाली. मात्र बैठकीत आश्वासन देण्यात आले. यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, आमच्या मागण्या पालकमंत्र्यांच्या लेव्हलवर नाही, त्यामुळे आंदोलन सुरूच राहील, मोर्चा होईल, अशी भूमिका व्यक्त केली. त्यामुळे आंदोलन सुरु ठेवण्यात आले. त्यानुसार सर्व शेतकरी एकवटले. मालेगावात जात असताना आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. यावेळी मालेगावच्या ईदगाह मैदानावर आंदोलकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. ईदगाह मैदानावर हजारो आंदोलकांचा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एल्गार पुकारण्यात आला.
7/7
यावेळी सरकारने लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्यानंतर पालकमंत्री भुसे फोनद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला. येत्या चार दिवसांत शेतकऱ्यांची व सहकार मंत्र्याशी बैठक घडवून आणून प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन दादा भुसे यांनी दिले आहे. त्यानुसार आंदोलन स्थगित करण्यात आले आहे, मात्र मागण्या महिनाभरात पूर्ण न झाल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर ठाण मांडून बसण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
Published at : 16 Jan 2023 11:53 PM (IST)