Monsoon Hair Fall: मान्सूनमध्ये होतोय केसगळती त्रास? 'हे' उपाय ठरु शकतील फायदेशीर
त्यामुळे पावसाळ्यात केसांची नीट काळजी घेणे गरजेचे असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे यासाठी काही उपया केल्यास या समस्येचा त्रास कमी होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया सविस्तर.
जर पावसात तुमचे केस भिजले तर लगेगच ते कोरडे करा. जर बराच वेळ तुमचे केस ओले राहिले तर केस कमकुवत होण्याची शक्यता असते.
केस कोरडे करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करणं टाळा. तसेच तुमचे केस नैसर्गिक रित्या कोरडे करण्याचा प्रयत्न करा.
केस कोरडे करताना त्यांना कधीही जोरात चोळू नका. तसेच सुती कपड्याने हळू हळू केस कोरडे करण्याचा प्रयत्न करा.
पावसाळ्याच्या दिवसात किमान आठवड्यातून दोनदा तरी केस धुवावेत. त्यामुळे केसांना पोषण मिळण्यास मदत होईल.
तसेच पावसाळ्याच्या दिवसांत किमान दोनदा तरी कोमट तेलाने केसांची मालिश करा. त्यामुळे तुमचे केस चांगले राहण्यास देखील मदत होईल.
केस पूर्ण कोरडो झाल्यानंतरच त्यामध्ये कंगवा फिरवा. ओल्या केसामध्ये कंगवा फिरवल्याने केस तुटण्याचे प्रमाण वाढू शकते.
तसेच ओले केस मोकळे ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमच्या केसामध्ये ओलावा राहून केस जास्त प्रमाणात गळू शकतात.