अंबानींचा कुत्रा 'हॅपी' 4 कोटी रुपयांच्या कारचा मालक, कोणती आहे 'ती' गाडी?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकतेच मुकेश अंबानी यांनी त्यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नावर हजारो कोटी रुपये खर्च केले. मुकेश अंबानी यांनी केवळ अंबानी कुटुंबातील सदस्यांच्या कपड्यांसाठीच नव्हे तर त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठीही अप्रतिम व्यवस्था केली होती.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये अनंत आणि राधिकाच्या लग्नात एका श्वानला आलिशान कारमध्ये नेले जात असल्याचे दिसले होते.
महागड्या कारमध्ये दिसणारा श्वान अंबानी कुटुंबाचा पाळीव प्राणी आहे. त्याचे नाव हॅप्पी आहे. तो मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत याच्या सर्वात जवळचा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॅप्पी हा अनंतचा पाळीव श्वान आहे. तो गोल्डन रिट्रीव्हर जातीचा कुत्रा आहे.
हॅपी चार वर्षांपासून अंबानी कुटुंबातील सदस्य आहे. ऑटोमोबाईल आर्डेंट इंडियाच्या पोस्टमध्ये हॅप्पी मर्सिडीज ब्रँडच्या कारमध्ये बसलेला दिसत आहे.
हॅपी अनंत आणि राधिकाच्या लग्नाला मर्सिडीज बेंझ G400D कारमध्ये जाताना दिसला होता. या कारची बाजारातील किंमत सुमारे 4 कोटी रुपये आहे.
या वर्षी मार्चमध्ये गुजरातमधील जामनगरमध्ये अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्येही हॅप्पी दिसला होता. अनंत आपला बहुतांश वेळ हॅप्पीसोबत घालवतो, त्यामुळे अनंतच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांमध्ये हॅपीचा सहभाग असतो.