IPL: आयपीएलमध्ये एकही षटकार मारला नाही; यादीत एका भारतीय खेळाडूचंही नाव

इंडियन प्रीमियर लीग ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा आहे. या लीगमध्ये खेळण्याचे आणि संपूर्ण जगाला आपले कौशल्य दाखवण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, परंतु प्रत्येकाला येथे खेळण्याची संधी मिळत नाही. या लीगमधील स्पर्धा इतकी वाढली आहे की, प्रत्येक गोलंदाजावर पहिल्याच षटकात विकेट घेण्याचे आणि फलंदाजावर षटकार आणि चौकार मारण्याचे दडपण असते. परंतु असे काही खेळाडू आहेत ज्यांना या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली, परंतु त्यांच्या आयपीएल कारकिर्दीत त्यांना कधीही षटकार मारता आला नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मानला जाणारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यालाही इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पुणे वॉरियर्स इंडियाच्या वतीने 2012 मध्ये आयपीएलमध्ये खेळण्यासाठी क्लार्क पहिल्यांदा मैदानात उतरला होता. क्लार्कला केवळ 6 सामन्यात खेळण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने 94 चेंडू खेळून 98 धावा केल्या. मात्र क्लार्कला एकही षटकार मारता आला नाही.

ऑस्ट्रेलियन फलंदाज कॅलम फर्ग्युसनलाही इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. कॅलम फर्ग्युसन पुणे वॉरियर्सकडून खेळण्यासाठी मैदानात आला होता. कॅलम फर्ग्युसन 2011 आणि 2012 मध्ये दोन हंगामात आयपीएलमध्ये खेळला होता. या कारकीर्दीत त्याला 9 सामन्यात केवळ 98 धावा करता आल्या. फर्ग्युसनलाही या कारकीर्दीत एकही षटकार टोलावता आला नाही.
ऑस्ट्रेलियाचा मायकेल कॅलिंगने देखील एकही सामन्यात षटकार मारला नाही. मायकेल कॅलिंगने 4 सामन्यात 73 धावा केल्या.
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकलाही इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याची संधी मिळाली. शोएब मलिकलाही या स्पर्धेत एकही षटकार मारता आला नाही. शोएब मलिकला आयपीएलच्या पाच डावात केवळ 52 धावा केल्या, ज्यात एकाही चौकाराचा समावेश नव्हता.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आकाश चोप्राला आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळण्याची संधी मिळाली. आकाश चोप्रा आयपीएलमध्ये केकेआरकडून दोन हंगाम खेळला, ज्यामध्ये त्याने 71 चेंडूत 53 धावा केल्या आणि एकही षटकार मारता आला नाही.