Aditi-Sidharth Wedding: आदिती राव हैदरी आणि सिद्धार्थचे लग्न, गुप्त लग्नाचे पहिले फोटो समोर!
बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ दीर्घकाळ डेटिंग केल्यानंतर अखेर लग्नबंधनात अडकले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोमवारी 16 सप्टेंबर रोजी दोघांनी गुपचूप लग्न केले. या जोडप्याने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या गुप्त लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
सिद्धार्थ आणि अदिती यांनी वर्षी मार्च महिन्यात तेलंगणामधील एका मंदिरात साखरपुडा उरकला होता.
त्यानंतर हे दोघे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती. अखेर दोघांनी आता लग्नगाठ बांधली.
अदितीने आपल्या विवाह सोहळ्यातील खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोसह तिने आपली भावना व्यक्त करणारे कॅप्शन दिले आहे.
सिद्धार्थ आणि अदिती हे 2021 मध्ये तामिळ-तेलुगू भाषेतील चित्रपट 'महा समुद्रम'च्या सेटवर भेटले होते. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. या दोघांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती.
मात्र, या दोघांनी या चर्चांवर भाष्य केले नव्हते. मात्र, नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी अदिती राव हैदरीने सिद्धार्थसोबतचे नाते मान्य केले होते. त्यानंतर मार्च महिन्यात त्यांनी साखरपुडा केला.
अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ यांचे हे दुसरे लग्न आहे. अदितीचा पहिला विवाह हा अभिनेता सत्यदिप मिश्रासोबत झाला होता.
अदितीचा पहिला विवाह वयाच्या 24 व्या वर्षी झाला होता. मात्र, अदितीने सिनेसृष्टीत नशीब आजमावण्यास सुरुवात केल्याने लग्नाची लपवण्यात आली होती.
काही वर्षानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिनेता सिद्धार्थ याने दिल्लीतील मेघना नारायण हिच्यासोबत 2003 मध्ये विवाह केला होता. मात्र, लग्नाच्या चार वर्षातच दोघांमध्ये वाद होई लागल्याने अखेर त्यांनी 2007 मध्ये घटस्फोट घेतला. अभिनेता सिद्धार्थ आणि अभिनेत्री श्रुती हसन यांच्यातही प्रेमप्रकरण सुरू असल्याची चर्चा होती.