Ambani Family Educational Details : मुकेश अंबानींची पत्नी निता अंबानी की दोन्ही सूना? कोण आहे जास्त शिकलेलं? जाणून घ्या
उद्योगपती अंबानी कुटुंब (Ambani Family) हे देशातीलच नाहीतर जगातील सर्वात प्रसिद्ध कुटुंब आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिवंगत उद्योगपती धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांनी शून्यातून सुरुवात केली आणि अंबानी कुटुंबाच्या व्यवसायाचा पाया घातला.
धीरूभाई यांचा व्यवसाय त्यांच्या कुटुंबाने अधिक विस्तारला. त्यांची मुलं मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी यांनी अंबानी कुटुंबाचं नाव जागतिक स्तरावर पोहोचवलं
मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती दिवंगत धीरूभाई अंबानी यांचा मोठा मुलगा.
मुकेश अंबानी यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईतून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे. पुढे ते MBA करण्यासाठी स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. पण त्यानंतर 1980 मध्ये त्यांना रिलायन्स कंपनीसाठी परत भारतात यावं लागलं, त्यामुळे त्यांनी एमबीएचं शिक्षण अर्धवट सोडलं.
नीता अंबानी यांचं प्राथमिक शिक्षण रोज मॅनर गार्डनमधून झालं आहे. त्यांनी पुढील शिक्षण मुंबईच्या नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून पूर्ण केलं आहे. अभ्यासासोबतच त्यांना नृत्याचीही खूप आवड आहे. लग्नानंतर त्या शाळेत शिक्षिका होत्या. त्यानंतर त्या धीरूभाई अंबानी शाळेचे संस्थापिका झाल्या.
मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने साऊथ एशियन स्टडीज आणि सायकोलॉजीमध्ये पदवी शिक्षण घेतलं आहे. यानंतर, 2014 पासून, तिने रिलायन्स रिटेल आणि रिलायन्स जिओ कंपनीचं काम हाताळण्यास सुरुवात केली. 2015 मध्ये, ईशा अंबानीचे नाव आशियातील शक्तिशाली आघाडीच्या व्यावसायिक महिलांमध्ये सामील होतं.
मुकेश अंबानी यांच्या मोठा मुलगा आकाश अंबानीने सुरुवातीचं शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून केलं. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून 2009 मध्ये आयबी डिप्लोमा प्रोग्राम पूर्ण केला. त्यानंतर 2013 मध्ये ब्राउन युनिव्हर्सिटी, यूएसए मधून बिझनेस-कॉमर्समध्ये पदवी शिक्षण घेतलं.
आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहतानं प्रिन्सटन युनिव्हर्सिटी, न्यू जर्सी, यूएसएमधून मानववंशशास्त्र (Anthropology) पदवी शिक्षण घेतलं आहे. याशिवाय तिला समाजकार्य करायला खूप आवडतं.
अनंत अंबानीने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर र्होड आयलंडमधील ब्राऊन विद्यापीठातून पदवी शिक्षण पूर्ण केलं.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची धाकटी सून राधिका मर्चंटने तिचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील इकोले मोंडियाल वर्ल्ड स्कूल आणि बीडी सोमाणी इंटरनॅशनल स्कूलमधून केलं. यानंतर तिनं 2017 मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी घेतली.
धीरूभाई अंबानी यांचा धाकटा मुलगा आणि मुकेश अंबानी यांचा भाऊ अनिल अंबानी यांनी किशनचंद चेलाराम महाविद्यालयातून सायन्समधून ग्रॅज्युएशन केलं आहे. तसेच पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूलमधून बिझनेझ ॲडमिनिस्ट्रेशनमधून मास्टर्स पूर्ण केलं आहे.
अनिल अंबानी यांची पत्नी टीना अंबानीने 1975 मध्ये फेमिना टीन प्रिसेंस खिताब जिंकला. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात केली. त्यांचं आर्ट्समधून पदवी शिक्षण पूर्ण झालं आहे.