Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
Air Hostess : देशातील अनेक तरुणी एअर होस्टेस होण्याचे स्वप्न पाहात असतात. आपलं स्पप्न पूर्ण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करत असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान, एअर होस्टेसचं करियर स्वीकारत असताना पालकांसह सर्वांनाच अनेक प्रश्न पडत असतात.
एअर होस्टेसची नोकरी आपण किती वर्षे करु शकतो? आपल्याला कधी निवृत्त व्हावं लागतं? याबाबात तुम्हाला माहिती आहे का?
एअर होस्टेसची नोकरी 8 ते 10 वर्षे करता येऊ शकते, असे बोलले जाते.
8 ते 10 वर्षानंतर या क्षेत्रात नोकरी करण्यात अडचणी येतात , असे बोलले जाते. मात्र, 8 ते 10 वर्षानंतर एअर होस्टेस बेरोजगार होतात असे नाही.
माडिया रिपोर्टनुसार, एअर होस्टेस म्हणून काम करत असताना वेळोवेळी बढती मिळत असते. वरिष्ठ पदांवर प्रमोशन मिळाल्यानंतर त्यांच्या अनुभवाच्या आधारे त्यांना सिनियर फ्लाईट अटेंडंट बनवण्यात येते.
शिवाय 8 ते 10 वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांना ग्रँड ड्यूटी किंवा व्यवस्थापनामध्ये काम करण्याची संधी देखील मिळू शकते.
दरम्यान, एअर होस्टेस बनण्यासाठी वयाची मर्यादा विचारात घेतली तर 18 ते 25 दरम्यान प्राधान्य देण्यात येत असल्याचे बोलले जाते.
एअर होस्टेसच्या पगाराबाबत बोलायचे झाले तर आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि राज्याअंतर्गत असा फरक असतो.
राज्याअंतर्गत काम करणाऱ्या हवाई सुंदरींना 30 ते 50 हजार रुपये पगार मिळू शकतो. तर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्यांना जास्तीचे पॅकेजस मिळू शकतात.