मुंबईकरांना पर्वणी... बॉलपेननं रेखाटलेल्या चित्रांचं प्रदर्शन; 'अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म'

मुंबईतील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरी येथे 1 ते 7 ऑक्टोबर 2024 दरम्यान कलाकार शिरीष देशपांडे यांचे लिव्हिंग विथ लाइन्स शीर्षकाचे चित्रप्रदर्शन भरवण्यात येत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत अर्बन रिदम्स अँड रुरल चार्म: अ व्हिज्युअल ओडिसी हे एकल प्रदर्शन होणार आहे. त्यामध्ये, केवळ बॉलपॉईंट पेनने रेखाटलेली चित्रे प्रदर्शनात पाहायला मिळणार आहेत.

विविध रंगाच्या बॉलपॉईंट पेनने केलेली लँडस्केप्स आणि सिटीस्केप्स, सर्वस्वी नवीन, याआधी कधीही न पाहिलेल्या कलाकृती या प्रदर्शनात असतील.
बॉलपेन या सर्वपरिचित माध्यमाची एक नवीनच ओळख कला रसिकांना या प्रदर्शनाने होणार आहे. बारीक तपशील, आकार आणि विविधतेने मंत्रमुग्ध होण्याचा सुखद अनुभव चित्रप्रेमींना घेता येईल.
हे प्रदर्शन एक अविस्मरणीय अनुभव देणारे असेल. एक्सप्लोरिंग द बॉलपॉईंट या कलाकाराने लिहिलेले पुस्तक देखील शो दरम्यान विशेष किमतीत उपलब्ध असेल.
पावसात भिजणारा माणूस, गावाकडेची संस्कृती दर्शवणारी भित्तीचित्रे, महापुरुषांची व्यक्तीचित्रे आणि विविध कलाकारी या चित्रामधून पाहायला मिळेल.
राजधानी मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाचंही चित्र प्रदर्शनात ठेवण्यात येईल. चित्रातील हे बारकावे पाहून निश्चितच तुमच्याही भुवया उंचावतील.