सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आणि 2024 वर्षाच्या शेवटच्या सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईसह कोकणातील बीचवरही पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील 2024 ची शेवटची संध्याकाळ, सूर्य अस्ताला जात असताना पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात यंदाच्या वर्षातील अखेरचा सूर्यास्त टिपा.
31 डिसेंबर 2024, या वर्षाचा अखेरचा सुर्योदय पाहण्याचा क्षण अनेकांसाठी विशेष ठरला आहे. सकाळी सोनेरी किरणांनी आकाशाला झळाळी दिली, आणि या वर्षाचा शेवटचा दिवस एक नव्या प्रेरणेने उजळून निघाला.
शहरातील समुद्रकिनारे, पर्वत, आणि उघड्या मैदानांवर लोकांनी या सूर्यास्ताचा क्षण डोळ्यात साठवण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी आपल्या कुटुंबीयांसोबत आणि मित्रमंडळींसोबत या खास क्षणाचे साक्षीदार झाले.
अनेक आठवणींचा साक्षीदार असलेल्या 2024 च्या सुर्यदेवाला नमस्कार करत 2025 च्या सूर्यनारायणाचे स्वागत करण्यासाठी लोकांमध्ये नवा उत्साह दिसून आला
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईत नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत होत, मुंबईच्या जुहू बीचवर पर्यंटकांनी गर्दी केली होती. तर,पर्यटकांना पोलिसांकडून, रक्षकांकडून सातत्याने सूचना दिल्या जात होता.
कुठे डोंगराआड जात असलेला, तर कुठे नदीपल्याड जाणारा, तर कुठे समुद्रात डुबकी लगावत असलेला सूर्यनारायण पाहायला मिळाला.
मुंबईसह, रायगड, सिंधुदुर्ग येथील समुद्रकिनारी पर्यटकांनी 2024 चा सूर्यास्त आपल्या कॅमेऱ्यात टिपून सोशल मीडियातून अनेकांना दाखवला.