140 किलोंचा 'वजनदार' अभिनेता, मालिकेत काम करण्यासाठी घेतो सर्वाधिक फी, 'हा' टॉपचा ॲक्टर आहे तरी कोण?
Ram Kapoor Transformation: अभिनेता राम कपूर सध्या आपल्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगलाच चर्चेत आहेत. या अभिनेत्याने आपले वजन 42 किलोपर्यंत घटवले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअभिनेता राम कपूर हा छोट्या पडद्यावरील म्हणजेच टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता आहे.
टीव्हीच्या दुनियेतील हे एक मोठे नाव असून त्यांचा चाहतावर्ग घराघरात आहे. हा अभिनेता एकूण 140 किलो वजनाचा होता. मात्र त्याच्या करिअरमध्ये त्याचे वजन कधीच आड आलेले नाही.
वाढलेले वजन आणि करिअर यावर त्याने नुकतेच भाष्य केले आहे. या देशात मी एकमेव असा अभिनेता आहे, ज्याचे एवढे वजन वाढलेले असूनही तो टॉपचा अभिनेता आहे, असे मत त्याने व्यक्त केले.
या अभिनेत्याने नुकतेच 40 किलोपर्यंत वजन कमी केलेले आहे. हे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणताना अगोदर मी 20 पावलं चाललो तरी मला दम लागायचा आता मात्र मला अगदी 25 वर्षाच्या तरुणासारखे वाटते, असे मत या अभिनेत्याने व्यक्त केले आहे.
या अभिनेत्याने घर एक मंदिर, कभी आए न जुदाई, रिश्ते, धड़कन, कसम यासारख्या प्रसिद्ध मालिकांत काम केलेले आहे.
राम कपूर सध्या काही चित्रपटातही झळकणार आहे. तसेच सध्या तो काही वेब शोज करतोय.
राम कपूर