कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटली, सगळीकडे पाणीच पाणी, पे अँड पार्किंगमधल्या बाईकचंही नुकसान
सुरेश काटे
Updated at:
27 Oct 2023 08:29 AM (IST)
1
Water Pipeline Burst At Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरामध्ये महापालिकेची पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्मार्ट सिटीचे काम सुरू असताना दीड ते दोन फूट व्यासाची पाण्याची पाईपलाईन फुटली.
3
पाईपलाईन फुटल्यामुळे कल्याण स्टेशन परिसर जलमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.
4
रात्री एकच्या सुमारास ही पाईपलाईन फुटल्यानं बाजूला असलेल्या लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी साचलेलं.
5
याशिवाय काही नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं.
6
फुटलेल्या पाईपलाईनच्या बाजूला पे अँड पार्किंग आहे.
7
पार्किंगमधल्या 15 ते 20 मोटारसायकलचं नुकसान झालं आहे.
8
पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.