Weather : महाराष्ट्रात थंडीची चाहूल, तापमानात घट
सध्या राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. कुठं उन्हाचा चटका लागत आहे, तर कुठे थंडीची चाहूल लागली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यात हळूहळू 'ऑक्टोबर हीट मावळतीकडे तर पहाटेचा गारवा उगवतीकडे' जात असल्याचं चित्र दिसत आहे.
महाराष्ट्रात आजपासून (26 ऑक्टोबरनंतर) अपेक्षित असलेल्या ऑक्टोबर हीटचा उतरतीकडे कल जाणवू लागला आहे.
सध्या पहाटेच्या गारव्यात कमालीची वाढ झाल्याची माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान भागपरत्वे सरासरीपेक्षा कमी जाणवत आहे. तर मध्य महाराष्ट्रातील खान्देश, नाशिकपासून सोलापूरपर्यंतच्या 10 जिल्ह्यात 2 ते 5 डिग्रीने कमी खालावले असून कमाल तापमानही मात्र सध्या सरासरी इतके जाणवत आहे.
महाराष्ट्रात थंडीला सुरुवात झाली आहे.
ऑक्टोबर हीटचा उतरतीकडे कल जाणवू लागला आहे. सध्या पहाटेच्या गारव्यात कमालीची वाढ
सध्या राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. कुठं उन्हाचा चटका लागत आहे, तर कुठे थंडीची चाहूल लागली आहे.
राज्यात हळूहळू 'ऑक्टोबर हीट मावळतीकडे तर पहाटेचा गारवा उगवतीकडे' जात असल्याचं चित्र दिसत आहे.