अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
भिवंडीच्या आकृती रुग्णालयातून दहा दिवस उपचारानंतर भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना आज डिस्चार्ज देण्यात आला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता माझी प्रकृती स्थिर असल्याची माहिती देत कांबळी यांनी नववर्षाच्या सुरुवातीला नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
कांबळी लवकरच मैदानावर परतणार असून शिवाजी पार्कच्या मैदानावर छक्के-चौकार लगावण्याची तयारी करत आहेत.
सचिन तेंडुलकरसोबत पुन्हा एकदा प्रॅक्टिस करण्याचा उत्साह त्यांनी व्यक्त केला आहे. कांबळी यांच्या या सकारात्मक संदेशाने आणि नशामुक्तीच्या आवाहनाने चाहत्यांमध्ये नवीन चैतन्य निर्माण झाले आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज घेताना विनोद कांबळीने टीम इंडियाची जर्सी अंगावर परिधान केली होती. तसेच, हाती बॅटही घेतली होती
मै छोंडूगा नही... असे म्हणत विनोद कांबळीने पुष्पास्टाईल करुन हॉस्पीटलमध्येच क्रिकेट खेळून दाखवले, तसेच छक्का मारल्याचंही त्याने म्हटलं.
हॉस्पीटलमधून निघताना त्याने रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ व हॉस्पीटलचे मालक यांचे आभार मानले
डोक्यावर कॅप, निळी जर्सी, डोळ्यावर गॉगल परिधान करुन मोठ्या कारमधून विनोद कांबळी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्या घरी परतला