Tembhi Naka Navratri : आता वेध नवरात्रीचे, टेंभी नाका नवरात्रोत्सवाचे मंडप पूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार, जाणून घ्या इतिहास आणि राजकीय महत्व
टेंभी नाका (Thane Tembhi Naka) येथील जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडप पूजनासाठी मुख्यमंत्री ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या हस्ते यावेळी पूजा संपन्न झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआजपासून टेंभी नाका नवरात्री मंडळाच्या मंडप उभारणीला आजपासून सुरुवातल झाली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव ठाण्यातील प्रसिद्ध उत्सव आहे.
ठाण्याच्या टेंभी नाका देवीची चर्चा सर्वाधिक असते. ठाण्याची दुर्गेश्वरी असे नाव असलेल्या या देवीचा इतिहास आणि राजकीय महत्त्व मोठं आहे.
शिवसेनेमध्ये (ShivSena) पडलेल्या फुटीनंतर या ठिकाणच्या नवरात्रीची जोरदार चर्चा असते.
धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांनी सुरू केलेला नवरात्र उत्सव म्हणजेच टेंभी नाका इथला नवरात्र उत्सव. 1978 साली या उत्सवाची सुरूवात झाली.
श्री जय अंबे मां सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्थेकडून हा उत्सव आयोजित केला जातो.
या देवीच्या मूर्तीचे देखील एक वैशिष्ट्य आहे. आनंद दिघे यांना झालेल्या देवीच्या साक्षात्काराची त्यांनी तशीच्या तशी मूर्ती बनवून घेतली. तीच आणि तशीच मूर्ती आजतागायत घडवली जात आहे.
स्वतः आनंद दिघे हे देवीची नऊ दिवस श्रद्धेने उपासना करायचे. हळूहळू टेंभी नाक्यावरील हा नवरात्र उत्सव ठाण्यात आणि ठाण्याच्या बाहेर देखील ख्याती मिळू लागला.
अगदी बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, महापौर, हे अनेक वेळा या देवीच्या दर्शनाला येऊन गेले आहेत.
फक्त शिवसेनेचेच नाही तर सर्वपक्षीय महत्त्वाचे नेते सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या देवीच्या दर्शनाला दरवर्षी येतात. तीच परंपरा पुढे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी देखील सुरू ठेवली होती. 2002 यावर्षी आनंद दिघे यांचे निधन झाले. त्यानंतर ठाण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी हा उत्सव सुरू ठेवला.