How to Take Care of Grandparents : 5 सोप्या पद्धतीने घरातील वृद्धांची काळजी घ्या, मानसिकदृष्ट्या राहतील आनंदी
आपल्या घरात असणारे आजी-आजोबा घराचा आधारस्तंभ असतात. त्यामुळे त्यांच्या शारिरीक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appघरातील वातावरण आणि घरात असणारे लोक आनंदी असेल तर वृद्ध देखील आनंदात राहतात. त्यांना ताण-तणाव, नैराश्य काहीही येत नाही.
घरातील वडीलधाऱ्यांना निरोगी ठेवण्यासाठी लोक डॉक्टर आणि औषधांची मदत घेतात. मात्र, ज्येष्ठांच्या आनंदाचे रहस्य घरातील लोक असतात. अशा परिस्थितीत वडिलधाऱ्यांना त्यांच्या समस्यांबद्दल विचारणे, घरात सेफ्टी फीचर्स बसवणे आणि त्यांना एकटेपणापासून दूर ठेवणे अशा काही टिप्स अवलंबून तुम्ही वडिलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवू शकता तसेच नेहमी आनंदी ठेवू शकता.
त्यांच्या व्यस्त दैनंदिन रूटीनमुळे लोक अनेकदा वृद्धांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतात. त्याच वेळी मुलांना काय वाटेल?, त्यांना आपले ओझे तर वाटणार नाही ना?, अशा सगळ्या कारणांमुळे घरातील वृद्ध कोणाशीही कोणतीच गोष्ट शेअर करत नाहीत.
अशा वेळी त्यांना एकटे वाटू नये किंवा नैराश्य येऊ नये याकरता त्यांच्याशी वेळोवेळी संवाद साधा. त्यांना एकटे पाडू नका. त्यांना त्यांच्या सर्व समस्या विचारा. तसेच त्यांच्यासोबत वेळ घालवताना त्यांच्या सवयींचे निरीक्षण करा. याच्या मदतीने तुम्ही त्यांच्या समस्या सहज दूर करू शकाल.
घरात असलेल्या काही गोष्टी वृद्धांसाठी मोठ्या समस्या निर्माण करू शकतात. अशा परिस्थितीत वृद्धांच्या सोयीनुसार घराच्या पायऱ्या, शॉवर सीट, टॉयलेट सीट तयार करा. त्याचबरोबर घरामध्ये निसरड्या फरशा बसवण्याची चूक करू नका. त्यामुळे वृद्ध पडण्याची भिती असते.
वृद्धांना तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यासाठी, तुम्ही त्यांना डॉक्टर किंवा थेरपिस्टकडे घेऊन जाऊ शकता. अशा परिस्थितीत, तुम्ही थेरपिस्टला काही शारीरिक हालचालींबद्दल विचारू शकता जसे की शॉर्ट वॉक किंवा योगा. त्यामुळे वृद्ध शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहतील.
म्हातारपणी आजारी पडल्यावर लोक अनेकदा वृद्धांना रुग्णालयात दाखल करतात. अर्थात हॉस्पिटलमध्ये उपस्थित नर्स आणि डॉक्टर त्यांची चांगली काळजी घेतात. परंतु वृद्धांच्या जलद बरे होण्यासाठी तुमचे घर गरजेचे असते. यामुळे वृद्धांना घरच्या वातावरणात बरे वाटेल आणि ते लवकर बरे होतील.
घरातील सदस्य अनेकदा वृद्धांकडे फारसे लक्ष देत नाहीत. अशा परिस्थितीत सगळ्यांसोबत राहूनही त्यांना एकटे वाटते. त्यामुळे घरतील प्रत्येक गोष्टीत मिसळून घ्या. प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीवर त्यांचे मत घ्यायला विसरू नका.
याशिवाय ज्येष्ठांनाही समाजातील लोकांशी संवाद साधण्याचा सल्ला द्या.