Ganpati Visarjan 2023 : सगळे पोलीस एकत्र जमले, लाडक्या बाप्पाची आरती केली, मग मुंबईभर ड्युटीसाठी रवाना!
अल्पेश करकरे
Updated at:
28 Sep 2023 02:10 PM (IST)
1
गेले दहा दिवस बाप्पाची मनोभावे उत्साहात सर्व गणेश भक्तांनी पूजा केली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज विसर्जन सोहळा, या निमित्त राज्यभर उत्साहाच वातावरण पाहायला मिळत आहे.
3
त्यात मुंबईतील प्रसिद्ध ताडदेव पोलीस वसाहत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वर्दीच्या राजाचं देखील विसर्जन आज पार पडणार आहे.
4
त्यामुळे ताडदेव पोलीस वसाहतीत राहणाऱ्या सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ड्युटीवर सज्ज होण्यापूर्वी बाप्पाची आरती केली.
5
यानंतर सर्व कर्मचारी आणि अधिकारी मुंबईभर आपल्या ड्युटीवर तैनात झाले आहेत.
6
गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10 हजार कर्मचारी असणार आहेत.
7
मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांनी आधी वर्दीच्या बाप्पाची शेवटची आरती केली आणि मग मुंबईकरांच्या सेवेसाठी रवाना झाले.