ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; पाईपलाईन फुटली, शहरात पुढील 24 तास पाणीपुरवठा नाही
अनिल वर्मा; एबीपी माझा, भिवंडी
Updated at:
17 Apr 2023 12:30 PM (IST)
1
भिवंडीत मुंबई- नाशिक महामार्गाजवळ ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
भिवंडीतील माणकोली परिसरात ही पाईपलाईन पहाटे फुटली असून लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.
3
ही ठाणे शहराला पाणीपुरठा करणारी ठाणे महानगरपालिकेची मुख्य पाईपलाईन आहे.
4
पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं आहे.
5
सध्या घटनास्थळी पाईपलाईन दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
6
पाईपलाईन फुटल्यामुळे आता ठाणकेरांची चिंता वाढली आहे.
7
ठाणे शहराला पुढील 24 तासाहून अधिक काळ पाणीपुरवठा होऊ शकणार नाही, अशी माहिती ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
8
तसेच, ठाणेकरांनी पाण्याचा वापर जपून करावा असं आवाहनही ठाणे महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आलं आहे.