Sangli News : बांधावर लावलेली आग भडकली, शेजारील शेतातील ट्रॅक्टर, द्राक्ष, डाळिंब बाग खाक; खानापुरातील घटना
सांगली जिल्ह्यातील खानापूर येथे एका शेतात लागलेल्या आगीत (Fire) लहान ट्रॅक्टर, ब्लोअर, डस्टिंग मशीन, ठिबक पाईप, हातपंप, कीटकनाशके, द्राक्षबागेच्या काही ओळी, तीस गुंठे क्षेत्रातील डाळिंब बाग जळून खाक झाली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया आगीमुळे खानापूरमधील आनंदराव बापू माळी या शेतकऱ्याचे जवळपास सव्वाआठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
आनंदराव माळी यांची तासगाव रस्त्यालगत द्राक्ष बाग आणि डाळिंब बाग आहे.
बागेजवळच शेती अवजारे आणि साहित्य ठेवण्यासाठी पत्र्याचे शेड आहे. दोन दिवसांपूर्वी शेजारच्या शेताची नांगरट सुरु होती. त्यावेळी शेजारच्या शेतातील महिलांनी 15 एप्रिल रोजी बांधाचे गवत पेटवले.
दुपारच्या सत्रात कडक उन्हात आगीने काही मिनिटांतच रौद्ररुप धारण केले. या बांधालगत असणारी माळी यांची डाळिंब बाग आगीत भस्मसात झाली.
यानंतर आग माळी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली. शेडमधील औषध फवारणी ट्रॅक्टर ब्लोअर, डस्टिंग मशीन, ठिबक पाईप, पंप, कीटकनाशके, केबल, खते, लाकडी बांबू, आगीत भस्मसात झाले.
यासोबतच बांधालगतच्या द्राक्ष बागेतील तीन ओळीमधील झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये माळी यांचे सव्वा आठ लाख रुपयांचे नुकसान झाले.
या आगीबाबत खानापूर पोलिसांत नोंद झाली आहे.
पोलिस फौजदार टी. डी. नागराळे, हवालदार शिवाजीराव हुबाले यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.