Eknath Shinde: उपमुख्यमंत्री शिंदेंचा सुपर संडे! रिक्षा, कार ड्रिफ्टिंग ते आलिशान बाईकची सफारी; 50 वर्ष जुनी विंटेजही चालवली, पाहा फोटो
रेमंड समुदायाच्यावतीने विंटेज कार व क्लासिक कार आणि सुपर कार प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. ठाण्यातील रेमंड मैदानात उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया प्रदर्शनाला आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी या कारच्या सफारीचा आनंद घेतला. त्यांनी यावेळी विंटेज कार चालवली. स्पोर्ट कारचाही आनंद त्यांनी घेतला.
50 वर्षांहून अधिक जुन्या सर्व विंटेज कार व मोटार सायकली या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. 30 ते 50 वर्षांपर्यंतच्या सर्व क्लासिक कार व मोटार सायकल, फेरारी, लॅम्बोर्गिनी, मॅकलरेन इत्यादी सर्व सुपर कार देखील या प्रदर्शनाचं आकर्षण ठरत आहेत.
अशातच एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणीला भेट दिली, या कार चालवण्याचा आनंद घेतला, त्यांचे हे नव्या अंदाजातले फोटो आणि व्हिडिओ त्या ठिकाणी असलेले लोक काढताना दिसले.
तर यावेळी एबीपी माझाशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहराच्या विकासाबाबत बोलताना लोक ठाण्याला पसंत करत आहेत, ठाणे सांस्कृतिक असल्याचे उद्गार काढले आहेत.
ठाण्यातील रेमंड मैदानात उद्योगपती गौतम सिंघानिया यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.