Aashram Pammi Pahalwan : 'आश्रम'मधील साध्या भोळ्या पम्मीचा ग्लॅमरस अंदाज, मराठमोळ्या आदिती पोहनकरने केलं घायाळ
'आश्रम' वेब सीरीजमधून अभिनेत्री आदिती पोहनकर हिलाही प्रसिद्धी मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'आश्रम'मधील साध्या भोळ्या अवतारात दिसणार पम्मी म्हणजेच आदिती पोहनकर रिअल लाईफमध्ये खूपच ग्लॅमरस आहे.
लोकप्रिय 'आश्रम' वेब सीरीजचा चौथा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी, आदितीचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
अदिती पोहनकरने तिच्या इंस्टाग्रामवर काही महिनाभरापूर्वी फोटो पोस्ट केले आहेत, मात्र ते आता चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये अदिती पोहनकर वेगवेगळ्या स्टायलिश लूकमध्ये पोझ देताना दिसत आहे. तिची ही स्टाईल त्याच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.
अभिनेत्री अदिती पोहनकरने 'लय भारी' या मराठी चित्रपटात अभिनेता रितेश देशमुखसोबत मुख्य भूमिका साकारली आहे.
हिंदी-मराठीसोबतच अदितीने तमिळ चित्रपट आणि वेब सिरीजमध्येही काम केले आहे.
अदिती पोहनकरने 2010 मध्ये 'लव्ह सेक्स और धोखा' या हिंदी चित्रपटातून तिच्या फिल्मी करियरला सुरुवात केली. तिने अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे.
आदिती पोहनकरने 2020 मध्ये, इम्तियाज अली दिग्दशित नेटफ्लिक्सच्या 'शी' वेब सीरीजमध्ये भूमिका साकारली आहे, ज्यामध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक झालं.
अदिती पोहनकर हिने कॅडबरी मंच, गोदरेज एईआर, एअरटेल, लेन्सकार्ट आणि सॅमसंग यासारख्या अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्येही काम केले आहे.
आदिती सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते आणि चाहत्यांसोबत फोटो आणि अपडेट्स शेअर करत असते.