Personality Development : तुमच्या 'या' छोट्या सवयी सांगतात तुमचे व्यक्तिमत्व कसे आहे?
आजचा काळ करिअर, यश आणि वैयक्तिक विकासासाठी खूप बदलला आहे. तुम्ही कसे बसता, बोलता, अगदी तुम्ही कसे चालता यावरून व्यक्तिमत्त्वाचे परीक्षण केले जाते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएक काळ असा होता जेव्हा लोक मोठ्या प्रमाणात पोशाख लक्षात घेऊन इतरांचे व्यक्तिमत्व ठरवायचे.
हा ट्रेंड आजही चालू आहे पण सध्या त्यामध्ये अनेक बदल झाले आहेत. आता लोकांच्या व्यक्तिमत्त्वातून एक नाही तर अनेक छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात.
आपण काही सवयी अंगीकारतो ज्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात लक्षात येतात.
भारतातील बहुतेक लोक चालताना चप्पल किंवा बूट घालून आवाज करतात. ही एक सवय आहे जी लोकांच्या लक्षात येत नाही. ही वाईट सवय आहे असे त्यांना वाटत नाही. तर व्यक्तिमत्व विकासात याला वाईट सवयीत मोडण्यात आले आहे.
ज्यांना ओरडण्याची, बोलण्याची सवय असते त्यांच्यासाठी लोकांच्या मनात नकारात्मकता निर्माण होते. हळू आणि नम्रपणे बोलणे हे चांगल्या गुणाचे लक्षण आहे. ज्यांना व्यक्तिमत्व घडवायचे आहे, त्यांनी आपली बोलण्याची पद्धत बरोबर ठेवावी.
तुम्ही कसे खाता ते टेबल मॅनर्समध्ये येते. जेवताना अन्न सोडणे आणि या दरम्यान बोलण्याची सवय हे वाईट व्यक्तिमत्त्वाचे लक्षण आहे. जर तुम्हाला चांगले व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर ही सवय त्वरित बदलण्याचा प्रयत्न करा.
काही लोकांना जास्त बोलण्याची सवय असते. बोलणे चांगले आहे, परंतु मजबूत व्यक्तिमत्व असलेल्या लोकांना अधिक ऐकणे आवडते. ते कमी बोलतात आणि त्यांचे मुद्दे पॉइंट टू पॉइंट ठेवतात. चांगल्या किंवा मजबूत व्यक्तिमत्त्वासाठी कमी बोलण्याची सवय लावा. ही सवय लावून घेतल्यास तुम्ही तुमच्या कामातही चांगले लक्ष देऊ शकता.
काही वेळेस आपले जास्त बोलणे इतर लोकांना त्रायदायक ठरू शकते. त्यामुळे फार बडबड करणे टाळावे. जेवढे गरजचे आहे तेवढेच बोलावे.
अनेकदा आपल्याकडे पेशन्स नसल्याने आपण खूप गोष्टी गमावून बसतो. मात्र थोडे पेशन्स म्हणजेच धीर धरला तर खूप गोष्टी योग्य पद्धतीने मार्गी लागतात आणि आपली यशाक़े वाटचाल सुरू होते. मात्र त्यासाठी तुम्हाला शांत आणि संयमाने वागण्याची आवश्यकता असते.