हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा! कल्याणामध्ये दीडहजार दिव्यांच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती
आज वसूबारस. दिवाळीचा पहिला दिवस. आजपासून खऱ्या अर्थानं दिवाळीला सुरुवात झाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज घरांघरांत दिवाळीची पहिली पणती लावली जाते.
यंदा कल्याणमध्ये दिवाळीची सुरुवात भगवा तलावापसून झाली.
एक दिवा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी या संकल्पनेतून आमदार विश्वनाथ भोईर यांनी तब्बल 1 हजार 500 दिव्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली छत्रपती शिवरायांची प्रतिकृती दिपोत्सवाचं विशेष आकर्षण ठरली.
कल्याण शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली आहे.
याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी, त्यांच्याबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम घेण्यात आला.
या दिपोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे, तब्बल 1 हजार 500 दिव्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची 10×10 फुटांची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली होती.
ज्याने उपस्थितांच्या डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडलं. महाराष्ट्रातील बहुधा हा पहिल्याच प्रकारचा प्रयत्न होता.
त्यासोबत भगवा तलाव परिसरातही उपस्थित मान्यवर आणि कल्याणकर नागरिकांच्या हस्ते या तलाव परिसरात एक हजार दिवे प्रज्वलित करण्यात आलं.
यंदाचा दिपोत्सव डोळ्यात साठवण्यासाठी आणि याचा साक्षीदार होण्यासाठी शिवप्रेमी आणि कल्याणकर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.