In Pics: डोळे दिपवणारी रोषणाई, भव्य मंडप, पताका; दिपोत्सवासाठी नववधूप्रमाणे सजलीये 'अयोध्यानगरी'
Ayodhya Deepotsav 2023: अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य आणि दिव्य रामलला मंदिरात 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यापूर्वी दिवाळीनिमित्त येथे दिव्यांच्या उत्सवाची तयारी सुरू करण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअवधपुरी नववधूप्रमाणे सजवण्यात आली आहे. रामनगरी रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघाली आहे. दीपोत्सवाबाबत सरकार आणि रामभक्तांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
उत्तर प्रदेश सरकार अयोध्येला तिचं प्राचीन वैभव मिळवून देण्यात गुंतलं आहे. दोन महिन्यांनंतर भगवान श्रीराम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान होतील.
यंदाच्या दिवाळी सणात योगी सरकार विश्वविक्रम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दिवाळीला अयोध्येतील राम की पौरी येथे 24 लाख दिवे लावले जातील.
गोस्वामी तुलसीदास लिखित श्री रामचरितमानसच्या सात अध्यायांवर आधारित सुंदर द्वार (बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधकांड, सुंदरकांड, लंका कांड आणि उत्तरकांड) अयोध्येत बांधलेल्या धर्ममार्गावर बांधले जात आहेत.
संस्कृती विभागानं तयार केलेले हे दरवाजे पर्यटन विभागाच्या देखरेखीखाली बसवले जात आहेत.
पर्यटन अधिकारी आरपी यादव यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, अयोध्येला पौराणिक वैभव आणि प्रतिष्ठेनं सजवलं जात आहे.
त्यासाठी अयोध्येत कोट्यवधी रुपयांची विकासकामं केली जात आहेत. रामायणातील सात अध्यायांतील विविध घटनांवर आधारित धर्ममार्गाचे द्वार बांधले जात आहेत.
महाद्वारांच्या बांधकामामुळे दीपोत्सवानिमित्त भाविकांना अयोध्येत पोहोचल्यावर त्रेतायुग आणि प्राचीन अयोध्येचा अनुभव येणार आहे.
दीपोत्सवानिमित्त अयोध्येला विविध प्रकारच्या दिव्यांनी सजवण्याचं काम वेगानं सुरू आहे. धरमपथावर रंगीबेरंगी दिवे लावण्यात येत असून, त्यात राम मंदिर मॉडेल, चांद मॉडेल, दीप मॉडेल आणि वॉल मॉडेलच्या दिव्यांनी अयोध्या उजळून निघाली आहे.