सुवर्ण मिठाईचे खवय्यांना आकर्षण, एक नगासाठी मोजवे लागतात तब्बल दोन हजार रूपये
दिवाळी आली की मिठाईच्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या आकर्षक चविष्ट मिठाई दुकानांमध्ये बनवल्या जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यातही महागातली महाग मिठाई घेण्यासाठी चढाओढ दिसून येते. ठाण्यात देखील अशाच एका मिठाईची सध्या चर्चा आहे
ठाण्यातील प्रसिद्ध प्रशांत कॉर्नर मिठाईच्या दुकानात सुवर्ण मिठाई उपलब्ध झाली आहे.
सुवर्ण वर्ख असलेली सुवर्ण मिठाई आहे
एका नगासाठी तब्बल दोन हजार रुपये असा दर असलेल्या या मिठाईला दरवर्षी काही ग्राहकांकडून मागणी असतेच.
मिठाईत 24 कॅरेट सोन्याचा वर्ख आणि ड्रायफ्रूट्स वापरले जातात.
एक किलो सुवर्ण मिठाईची किंमत 18 हजार रूपये आहे
सोन्यासोबतच अतिशय उच्च प्रतीचे ड्रायफ्रुट्सदेखील यात वापरलेले आहेत
मिठाईप्रेमीही या मिठाईवर फिदा आहेत. ही मिठाई खूपच क्रिएटिव्ह आहे, असं त्यांना वाटतं.
मोतीचूर लाडूपासून ते कुकीज, बर्फीपर्यंत सगळ्या प्रकारची मिळाई इथे मिळते.