PHOTO : पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत एका प्रवाशाचा मृत्यू
पुणे रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झालीय. या चेंगराचेंगरीत पुणे-दानापूर एक्सप्रेसमध्ये चढणाऱ्या एका प्रवाशाचा मृत्यू झालाय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपावलीनिमित्त गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या आसपास एक नंबरच्या प्लॅटफॉर्मवर पुण्याहून दानापूरच्या दिशेने जाणारी गाडी आली. गाडी येताच स्थानकावरील प्रवाशांनी गाडीत चढण्यासाठी एकच गर्दी केली.
सगळे प्रवाशी एकदम रेल्वेत चढताना एक प्रवाशी खाली पडला. परंतु, खाली पडलेल्या प्रवाशाला उचलण्याऐवजी लोक त्याला चेंगरून रेल्वेत चढले. यात त्या प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
मृत्यू झालेला प्रवासी अगोदरच आजारी होता. त्यात त्याला उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पुणे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे.
शनिवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुवारास ही घटना घडलीआहे.
शवविच्छेदनानंतरच या प्रवाशाच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीय.
घटना घडल्यानंतर रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.