PHOTO: 'एबीपी माझा'च्या आवाहनाची कृषिमंत्र्यांकडून दखल; दिला 1 लाख 'आनंदाचा शिधा' मोफत
'एबीपी माझा'च्या आवाहनाची कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दखल घेतली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे सिल्लोड- सोयगाव मतदार संघातील जनसामान्यांची दिवाळी होणार गोड होणार.
अब्दुल सत्तार यांच्यामुळे सिल्लोड- सोयगाव मतदार संघातील रेशनकार्ड धारकांना आनंद शिधा मोफत मिळणार आहे.
राज्य शासनाने यासाठी 100 रुपये शुल्क आकारले आहेत.
मात्र कृषिमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने आनंद शिधाचे शुल्क भरण्यात आले आहे.
त्यामुळे सिल्लोड- सोयगाव मतदारसंघातील जवळपास 1 लाख शिधा पत्रिका धारकांना रेशन दुकानातून आनंद शिधा किट मोफत मिळणार आहे.
अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने दिवाळीच्या भेट स्वरूपात आनंद शिधा किट मोफत देण्यात येत आहे.
त्यामुळे सिल्लोड- सोयगाव मतदारसंघातील शिधाकार्ड धारकांनी आनंद शिधा किटसाठी शुल्क देऊ नये असे आवाहन अब्दुल सत्तार यांनी केले आहे.
'एबीपी माझा'च्या आवाहनाला प्रतिसाद देत कृषिमंत्री सत्तार यांनी हा निर्णय घेतला आहे.