PHOTO : जितेंद्र आव्हाडांनी शिंदे गटाला डिवचले, '50 खोके एकदम ओके' लिहिलेला केक कापला
मुंब्रामधील काही नगरसेवक लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. (PHOTO : PTI)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमात्र जितेंद्र आव्हाडांनी मुंब्रामधील गद्दार फॅमिली गेल्याने मला काहीही फरक पडत नसल्याचे म्हटले होते. (PHOTO : PTI)
हाच धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंब्रा येथील स्थानिक कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने केक कापण्यात आला.
या केकवर गद्दार फॅमिली, 50 खोके एकदम ओके, खोके बोके..माजलेत बोके, अशा आशयाचे मेसेज लिहिलेले होते.
विशेष म्हणजे वाढदिवस जरी कार्यकर्त्याचा असला तरी केक मात्र आव्हाडांनी कापला
त्यातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही वाढदिवस आहे. (PHOTO : PTI)
त्यामुळे केक कापून आव्हाड नक्की कोणावर निशाणा साधत आहेत याची ठाण्यात चर्चा होत आहे
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेंद्र नाईक या कार्यकर्त्याचा काल (8 फेब्रुवारी) वाढदिवस होता.
या कार्यकर्त्याने जितेंद्र आव्हाड यांना शिंदे गटाला उद्देशून विविध मेसेज असलेला केक कापला.