PHOTO : देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, ठाण्यातील निवासस्थानी जाऊन भेट
या भेटीचे फोटो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या ट्विटर हॅण्डलवर शेअर केले आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा! त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, या शुभकामना!, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छ दिल्या.
यावेळी भाजप आमदार निरंजन डावखरे देखील उपस्थित होते.
मागील वर्षी जून महिन्यात 40 आमदारांसह बंड करत एकनाथ शिंदेंनी वेगळा गट केला आणि त्यानंतर भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. (PHOTO : PTI)
यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असं म्हटलं जात असतानाच त्यांनी धक्का दिला आणि एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री असल्याचं जाहीर केलं. (PHOTO : PTI)
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकनाथ शिंदे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील देवेंद्र फडणवीस आणि निरंजन डावखरे यांचा सत्कार केला.