CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आज वाढदिवस, ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांची गर्दी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ठाण्यात रात्री कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
CM Eknath Shinde Birthday
1/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त ठाण्यात ठिकठिकाणी शुभेच्छांचे बॅनर लागले आहेत.
2/10
एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी रात्रीपासून कार्यकर्त्यांनी ठाण्यात गर्दी केली आहे.
3/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी
4/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थानात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देखील केली. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते ठाण्यात दाखल झाले होते.
5/10
ठाण्यात अनेक ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बँनर लागले आहेत. काही ठिकाणी बॅनरवर भेटला विठ्ठल असे लिहले आहे.
6/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
7/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यातील अनेक ठिकाणी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
8/10
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज आपला 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्त राज्यभर अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
9/10
आज दुपारी 1.30 वाजता एमएमआरडीएनं बांधलेल्या कोपरी ब्रिजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
10/10
ठाण्यात एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. रात्री उशीरापर्यंत मुख्यमंत्र्यांनी स्वीकारल्या शुभेच्छा.
Published at : 09 Feb 2023 08:59 AM (IST)