Ganeshostav 2023 : भिवंडीत घरगुती गणपतीला राम मंदिराची आरास, पाहा फोटो
यंदा लालबागमध्ये गणेश गल्ली अर्थातच मुंबईच्या राजाला राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशीच एक सजावट घरगुती गणपतींना करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
भिवंडी ,काप आळी येथील बळवे कुटुंबाच्या वतीने 70 वा घरगुती गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.
यावेळी त्यांनी अयोध्या येथील राम मंदिराची प्रतीकृती साकारली आहे.
विशेष म्हणजे आयोध्या येथील राम मंदिरामध्ये जेवढे खांब लागणार आहेत तेवढेच खांब लावून हे मंदिर साकारण्यात आलं आहे.
दरम्यान राम मंदिर बनवण्यासाठी बळवे कुटुंबीयांना दीड महिन्यांचा कालावधी लागला.
काठी, कागद, माचीसच्या काड्या, कागदी पुठ्ठ्याचा वापर या देखाव्यासाठी करण्यात आलाय.
इकोफ्रेंडली असा अयोध्या येथील राम मंदिराचा देखाव साकारण्यात आला आहे.
तसेच सगळीकडे राम राज्य नांदू दे अशी प्रार्थना बळवे कुटुंबीयांनी बाप्पा कडे केली आहे.