Ashi Hi Banwa Banwi: अशी ही बनवाबनवी चित्रपटाची 35 वर्षे; चित्रपटामधील हे डायलॉग्स आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतात
अशी ही बनवाबनवी हा चित्रपट 23 सप्टेंबर 1988 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटामधील डायलॉग्स, गाणी आणि कलाकारांचा अभिनय या सर्वच गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधनंजय माने इथेच राहतात का? या अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील डायलॉग ऐकून आजही प्रेक्षक हसवतात.
अशी ही बनवाबनवी या चित्रपटाचा आणि लिंबू कलरच्या साडीचे खास कनेक्शन आहे. अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील अशोक सराफ आणि अश्विनी भावे यांच्यावर चित्रीत झालेल्या सीन्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
'हा माझा बायको पार्वती' या 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटामधील डायलॉगला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
आमच्या शेजारी राहते, नवऱ्याने टाकलंय तिला या अशोक सराफ यांच्या डायलॉगला पसंती मिळाली.
लक्ष्मीकांत बेर्डे (परशुराम), अशोक सराफ (धनंजय माने), सुशांत रे (शंतनू माने), सचिन पिळगांवकर (सुधीर), सुप्रिया पिळगांवकर (मनीषा), निवेदिता जोशी (सुषमा), प्रिया अरुण (कमळी), अश्विनी भावे (माधुरी), सुधीर जोशी (विश्वास सरपोतदार), नयनतारा (लीलाबाई काळभोर) आणि विजू खोटे (बळी) या कलाकारांनी अशी ही बनवाबनवी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली.
अशी ही बनवाबनवी या चित्रपटामधील मनुजा जग जरा, हदयी वसंत फुलताना, तुझी माझी जोडी जमली, कुणीतरी येणार गं या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
धनंजय, शंतनू, परश्या आणि सुधीर या मित्रांची ही भन्नाट गोष्ट अजही प्रेक्षक आवडीनं बघतात.