परदेशी पाहुणा 'सीगल' भारतात दाखल, कल्याण खाडी पात्रात मनसोक्त विहार करतात थवे, पक्षीप्रेमींची गर्दी
भिवंडी-कल्याण सीमेवरील खाडीवर सध्या परदेशी सीगल पक्षी या पाहुण्यांचे आगमन झालंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपांढरा शुभ्र रंग, पंखांवर करडा रंग, लालसर काळी चोच आणि काळेभोर बोलके डोळे असं मोहक रूप या पक्ष्यांचं असतं.
अमेरिका आणि युरोपमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून आलेल्या सीगल पक्षांनी भिवंडी आणि कल्याण सीमेवरील खाडीवर मुक्काम ठोकला आहे.
अमेरिका, युरोप येथून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी दरवर्षी याचवेळी भारतात दाखल होतात.
पुढचे दोन महिने हे पक्षी इथेच मुक्काम करतील आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच पुन्हा एकदा ते माघारी परततील.
अथांग पसरलेल्या खाडी पात्रात मनसोक्त विहार करणाऱ्या पांढऱ्या शुभ्र सीगल पक्षांचे थवे उडताना दिसत आहेत.
सीगल पक्षांच्या मुक्त विहाराची विलोभनीय दृश्य सध्या यामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना दिसत आहेत.
सीगल पक्षांना पाहण्यासाठी पक्षीप्रेमी खाडी पुलावर गर्दी करत आहेत.
सीगल पक्षी पाहण्यासाठी, त्यांना कॅमेऱ्यात टिपण्यासाठी कल्याणकर, पक्षीप्रेमी आणि निसर्ग छायाचित्रकारांची खाडी पुलावर मोठी गर्दी होतेय.
या पक्षांचं मुख्य खाद्य छोटे मासे, खेकडे आहे.
पण येथील खाडी पुलावर स्थानिकांकडून या सीगल पक्षांना शेव, चिवडा, ब्रेड, पाव तर लहान मुलांकडून चक्क कुरकुरे खायला घातले जात आहेत.
सीगल पक्षांना कोणीही शेव, चिवडा, फरसाण खायला देऊ नये, असं आवाहन पक्षीप्रेमींकडून देण्यात आलं आहे.