Photo: अनेकांच्या काळजात घर करणारी 'सिर्फ तुम'ची आरती सध्या काय करते?
'सिर्फ तुम' चित्रपटातील आरती आठवतेय का? तीच जी कधीही पाहिलं नसलेल्या दीपकच्या प्रेमात वेडी होते, त्याला शोधायला मुंबईला... 'जिंदा रहने के लिये तेरी कसम, इक मुलाखात जरुरी है सनम' असं म्हणणारी आरती जेव्हा दीपकच्या शोधात कावरीबावरी होते तो क्षण पाहणाऱ्या प्रत्येकाचं काळीज हेलावतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या भलेही चित्रपटांपासून दूर असतील, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या चाहत्यांशी कनेक्ट राहिल्या आहेत. तर दुसरीकडे अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वत:ला चित्रपटांपासून आणि या झगमगत्या दुनियेपासून दूर ठेवलं आहे. प्रिया गिल ही त्यापैकीच एक अभिनेत्री.
बॉलिवूड अभिनेत्री प्रिया गिलने 'सिर्फ तुम' (Sirf Tum actress Priya Gill) चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर अशी काही छाप सोडलीय की ती आजही त्याच चित्रपटासाठी ओळखली जाते.
पण सौंदर्याच्या बाबतीत एकेकाळी ऐश्वर्यालाही टक्कर देणारी प्रिया गिल सध्या काय करते? प्रिया गिल चित्रपटांपासून दूर आहे का? हे आणि असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडतात.
प्रिया मुख्यतः हिंदी चित्रपटांसह पंजाबी, मल्याळम, तामिळ, भोजपुरी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये दिसली आहे. ती 'मिस इंडिया 1995' मध्ये सेकंड रनरअप देखील होती.
प्रियाने 1996 मध्ये 'तेरे मेरे सपने' या चित्रपटाद्वारे तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अर्शद वारसी आणि चंद्रचूड सिंग यांसारखे दिग्गज कलाकार होते. परंतु तिचा हा पहिला चित्रपट फारसा चालला नाही.
प्रियाचा पहिला चित्रपट चालला नसेल, पण तिच्या सौंदर्याची सर्वत्र प्रशंसा झाली आणि याच दरम्यान तिला 'सिर्फ तुम' हा चित्रपट मिळाला. हा चित्रपट 1999 साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात ती संजय कपूरसोबत दिसली होती.
'सिर्फ तुम' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि त्यासोबतच अभिनेत्री प्रिया गिल देशभरात प्रसिद्ध झाली. या चित्रपटानंतर प्रियाची जबरदस्त लोकप्रियता पाहायला मिळाली. सिर्फ तुम नंतर ती 'जोश' (2000) आणि 'रेड' (2002) यासारख्या चित्रपटात दिसली.
नंतरच्या काळात प्रिया गिल ही अनेक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येही दिसली, पण तिथेही तिला यश मिळाले नाही. अखेर तिने चित्रपटांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या 17 वर्षांपासून ती कुठे गेली हे अनेकांना माहिती नाही.
प्रिया गिल आता देश सोडून डेन्मार्कमध्ये स्थायिक झाली आहे आणि तिचे वैवाहिक जीवन एन्जॉय करतेय.