Badlapur PHOTO : बदलापूरमध्ये अत्याचार, आंदोलन आणि लाठीचार्ज; 12 तासांमध्ये काय काय घडलं?
रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करणाऱ्या बदलापूरकरांना पोलिसांनी लाठीचार्ज करत पांगवलं. तब्बल 12 तासांपासून बदलापूरकरांचं रेल्वे ट्रॅकवर आंदोलन सुरु होतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबदलापुरातल्या नामांकित शाळेत दोन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार झाला होता. त्यानंतर बदलापूरकर आक्रमक झाले.
आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मारत आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली. निर्णय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली.
पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याची वारंवार विनंती केली.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही आंदोलन मागे घ्यावं, राज्य सरकार दोषींना शिक्षा देईल असं आश्वासन दिलं.
तरीही आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवलं. शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवलं.
यावेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला.
बदलापूरमधील शाळेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. सफाई कर्मचाऱ्यांनेच दोन चिमुकल्यांवर अत्याचार केला.
पालकांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केली. सुरूवातीला पोलिसांनी तक्रार न घेता पालकांना 12 तास ताटकळत ठेवलं.
त्यानंतर पालकांनी थेट शाळेवर हल्लाबोल करत शाळा फोडली.
या घटनेनंतर गृहमंत्र्यांनी संबंधित पोलिसांना निलंबित केलं आणि या प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना केली.
आयपीएस अधिकारी आरती सिंह या प्रकरणाचा तपास करणार असून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे.