Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Twitter Blue Tick : ट्विटरवरील ब्लू टिकचा रंग बदलणार? एलॉन मस्क यांचं नवं ट्विट चर्चेत
ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी नवीन ट्विट करत माहिती दिली आहे की, ट्विटरवरील ब्लू टिक सबस्क्रिप्शिनची सेवा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय सध्या थांबवण्यात आला आहे. बनावट खात्यांना आळा घालण्यासाठी काही ठोस उपाययोजना नाही, तोपर्यंत हा निर्णय लांबवण्यात आला आहे. ( PC : istockphoto)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतसेच मस्क यांनी सांगितलं की, ट्विटरवर ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा सुरु होण्यासाठी युजर्सना वाट पाहावी लागणार आहे. तसेच ट्विटर कंपनी ब्लूक टिकचा कलर बदलण्याचा विचार करत आहे.
एलॉन मस्क यांनी सांगितलं आहे की, ट्विटरवर व्यक्ती आणि संस्थांसाठी वेगवेगळ्या रंगाची टिक आणण्याचा विचार सुरु आहे. याबाबत कंपनीकडून येत्या काळात अधिक अपडेट समोर येईल.
मस्क यांनी तूर्तास आठ डॉलरचं पेड ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा सुरु करण्याचा निर्णय सध्या थांबवला आहे. ट्विटवर अनेक बनावट अकाऊंट आहेत, ही अडचण लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी ट्विटरकडून प्रयत्न सुरु आहे. ( PC : istockphoto)
ट्विटरने ब्लू टिक पेड सबस्क्रिप्शन सेवा सुरु केल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी बंद केली. ही सेवा सुरु झाल्यापासून बनावट अकाऊंटच्या संख्येत झपाट्याने वाढू लागली होती, त्यामुळे कंपनीने पेड सबस्क्रिप्शन बंद करण्याचा निर्णय घेतला.
एलॉन मस्क ( Elon Musk ) यांनी ट्विटरवरील ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा ( Twitter Blue Subscription ) निर्णय तूर्तास स्थगित केला आहे. ( PC : istockphoto)
ब्लू टिक सब्सक्रिप्शनचा 29 नोव्हेंबरपर्यंत सुरु होईल अशी घोषणा मस्क यांनी केली होती. मात्र आता हा निर्णय लांबवण्यात आला आहे. ( PC : istockphoto)
मस्क यांनी ब्लू टिक सब्सक्रिप्शन सुरु करण्याचा निर्णय लांबवला आहे. एलॉन मस्क यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. ( PC : istockphoto)
एलॉन मस्क यांनी ट्विट करत लिहिलं आहे की, बनावट अकाऊंटला पूर्णपणे आळा बसवण्यासाठी योग्य मार्ग सापडेपर्यंत ब्लू टिक सबस्क्रिप्शन सेवा लाँच करणं थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बनावट खात्यांवर कारवाई केल्यानंतर ट्विटरकडून ब्लू टिक सब्सक्रिप्शन सुरू केली जाऊ शकते.